(https://srbhamare.blogspot.com) welcome to my blog

Thursday, July 15, 2021

HSC Board Technical Instructions

 

बारावीचे सुधारीत मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार गुण भरण्यासाठी तांत्रिक सुचना

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळपुणे. यांच्या मार्फत इ. 12 वी चे सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसारदि. 16 जुलै 2021 पासून विषयनिहाय व संकलित गुणांची नोंद मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये भरणेबाबत

   तांत्रिक सूचना (Technical Instructions).

संगणक प्रणालीमध्ये सर्व गुण / श्रेणी / इतर मजकूर यांची नोंद करताना फक्त इंग्रजी अंक व अक्षरे वापरावीत

2 गुण संगणक प्रणाली मध्ये भरतांना मंडळाच्या

      A)    https://mh-hsc.ac.in 

      B)    http://mahahsscboard.in  

 या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.

परीक्षेची वेपत्र (form)  भरण्यासाठी वापरलेलाच User Name, Password  वापरुन  login  करावे.  

 Login  केल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार संगणकीय प्रणालीमध्ये दिसतील.

      1 नियमित विद्यार्थी (Regular Candidate)

      2 पुनर्परीक्षार्थी (Repeater Candidate)

      3 खाजगी विद्यार्थी (Private Candidate)

     4 तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी (Isolated Candidate)

      5 एनएसक्युएफ / एमसी व्हिसी अंतर्गत विषय घेऊन प्रविष्ट होणारे नियमित विद्यार्थी (NSQF Regular/ MCVC Regular)

माहिती भरण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा वरील पैकी एक

प्रकार निवडावा.

सदर प्रकारावर क्लिक केल्यानंतर शाळा / कॉलेज  मार्फत आवेदनपत्र (form) भरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी बैठक क्रमांक निहाय दिसेल.

विद्यार्थ्यांचे गुण नोंदविण्यासाठी त्याच्या नावापुढील "Fill Marks " या पर्यायावर क्लिक करावे.

8 तदनंतर विद्यार्थ्यांने परीक्षा आवेदनपत्रात निवडलेले विषय दिसतील. प्रत्येक विषयासमोर दिलेल्या रकान्यांमध्ये संबंधित विद्यार्थ्यास त्या त्या परीक्षा प्रकारात प्राप्त झालेले गुण / श्रेणी याची नोंद भारांशानुसार करावी.

      यासाठी निकाल समितीने पडताळणी करून अंतिम केलेले गुणच संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी ग्राहय धरण्यात यावेत.)

ज्या विषयांची भाग 1 व भाग- 2 अशी विभागणी दर्शविली आहे, तेथे दोन्ही भागांसमोर गुण नोंदवावेत.

10 पुर्नपरिक्षार्थी व तुरळक विषयास प्रविष्ट विद्यार्थ्यांचे गुण भरतांना यापूर्वी इ. 12 वी परीक्षेस उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेच्या तपशिलासह सदर विषयाच्या लेखी परीक्षेचे व तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे प्राप्त झालेले गुण स्वतंत्रपणे भरावेत.

11 संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेल्या विषयात अथवा विषयातील सूट यामध्ये बदल असल्यास सदर विषयासमोरील गुणांच्या सर्व रकान्यामध्ये MM असे दर्शवावे.  तसेच सर्व विषय / काही विषय / विषयांच्या काही मूल्यमापनास अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित ठिकाणी AA असे दर्शवावे. सदर दुरुस्तीचा तपशील / बदललेल्या विषयाचे गुण व इतर तपशील संबंधित विभागीय मंडळास परिशिष्ठामध्ये नोंदवून वेगळया पाकीटात पुढील कार्यवाहीसाठी जमा करावे.

12 विद्यार्थ्याची विषयनिहाय माहिती भरल्यानंतर "Submit" या पर्यायावर क्लिक करावे. विद्यार्थ्यांच्या भरलेल्या गुणांची पुनःश्च पडताळणी करून घ्यावी. एकदा भरलेले गुण / श्रेणी आवश्यकता असल्यास “Edit Marks" हा पर्याय निवडून बदल करता येईल.

13 उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्याच्या नावासमोर "Confirm" हा पर्याय उपलब्ध होईलतो क्लिक करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याची माहिती “Confirm" केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.   तसेच “Confirm" या पर्यायावर क्लिक केल्याशिवाय गुण ग्राहय धरले जाणार नाही.

14 प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुण नोंदणीसाठी वरीलप्रमाणे स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.

15 "Report " मेनू वर जाऊन विद्यार्थ्याच्या गुणांची पडताळणी करता येईल.

16 अतिविलंब / विशेष अतिविलंब / अतिविशेष अतिविलंब शुल्काने उशिरा आवेदनपत्र भरल्याने अथवा अन्य कारणाने ज्या विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक व इतर माहिती संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध नसेल अशा विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बैठक क्रमांक विभागीय मंडळाकडून प्राप्त करुन घेण्यात यावा. सदर विद्यार्थ्याचे गुण / श्रेणी / अन्य तपशिल बैठक क्रमांकासह परिशिष्ठामध्ये भरण्यात यावेत व सिलबंद पाकिटातून विभागीय मंडळाकडे जमा करावे. अशा अतिरिक्त बैठक क्रमांकाबाबत संबंधित विभागीय मंडळामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

17 महत्वाचे संगणक प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे गुण / श्रेणी / इतर मजकूर यांची नोंद करण्याची कार्यवाही मंडळाने दिलेल्या कालावधीतच करणे अनिवार्य आहे. तद्नंतर यासाठी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही.